Namaskar mitrano,
Marathi chat madhe aaple swagat aahe, kahi lokanchi complaint aahe ki tyana chat box disat nahi, tar sarvani lakshadya ki tumchyakade Flash player installed aahe ani tumhi Mozilla Firefox use karat aahe, karan baki sarva browser madhe chat box cha problem aahe.........

Dhanyavad

पुन्हा ती भेटली, तेव्हा..

Posted on Monday, June 7, 2010 by Ajit


भेटलीस तू.. बोललीस तू..
थांबल्या दिशा, थांबले ऋतू
थांबला जणू काळ तेवढा
काळ जेवढा.. थांबलीस तू !


भासलीस तू कापरापरी,
काजळी जणू.. काजळावरी
कंप पावती खोल पापण्या
सांगती तुझी बातमी खरी


स्मित मोजके, बोलणे कमी
त्याच चौकश्या, तीच बातमी..
जे मनात ते, बोललो कुठे?
होत राहिले हेच नेहमी..


हासणे तुझे.. स्फुंदणे तुझे..
आळसावणे.. रंगणे तुझे..
त्या कळा कुठे? रंग ते कुठे?
लोपले कुठे.. चांदणे तुझे?


शब्द का मुके? मौन बोलके..?
बोल ना जरा, बोल नेमके
सांग कल्पना, सांग शक्यता
सांग वेदना.. सांग हुंदके!


सांग ना तुला, टोचते कुठे?
काय वाटते? बोचते कुठे?
बोलतेस तू त्या तटावरी..
या तटावरी पोचते कुठे?


तीच तू जरी.. तोच मी जरी
वेगळे किती वाटतो तरी !
एवढी कशी आज अंतरे?
वाढली कधी, सांग ही दरी?


पोकळी कधी ही भरायची?
उत्तरे कशी सापडायची?
प्रश्न राहिले.. आपल्यामधे
वेळ जाहली..तू निघायची..
.
.
.

काय घेतले? काय मी दिले?
काय वाढले? काय छाटले?
आठवे अता एवढेच की..
एकटे मला.. फार वाटले !

एकटे मला फार वाटले !




-ज्ञानेश.

आजकालचा चंद्र

Posted on by Ajit


आजकाल चंद्र पूर्वीसारखा दिसत नाही
आजकाल चंद्र पूर्वीसारखा हंसत नाही

पूर्वी तो दिसायचा
मामाच्या चिरेबंदी वाड्यातून
पूर्वी तो हंसायचा
लिंबोणीच्या झाडा मागून
पण......

आता मामा गेलाय
ग्रीन कार्ड घेऊन
दूरदेशी, परदेशात
तो चिरेबंदी वाडा
तो ही रहिलेला नाही
लिंबोणीचं झाड भूईसपाट करून
तिथं उभ्या राहिलेल्या
पंचवीस मजली इमारतीच्या
चौदाव्या मजल्यावरच्या
2BHK flatच्या खिड्कीतून
चंद्र दिसतो खरा
पण तो ओळ्खीचा वाटत नाही

आजकाल चंद्र पूर्वीसारखा दिसत नाही
आजकाल चंद्र पूर्वीसारखा हंसत नाही

-अशोक
(पूर्व प्रसिद्धी: दै. सकाळ: २०/०२/२००५)

येरे येरे पावसा

Posted on by Ajit


येरे येरे पावसा
जवळ जरा ये....
छत्री घेतली नवी
थांब तुला दाखवते

मोग-याची फ़ुले
अन हिरवे हिरवे पान
लव्हेंडर कलर बघ
दिसते किती छान

बारीक सफ़ेद ठिपके
अन डौलदार झुल
पाहून माझी छत्री
तुला पडली ना भूल

मोठी आहे छत्री
कशी भिजवशील मला
मी नाही देणार
माझी छत्री कुणाला

आत्ता का रडतोस
अरे काय रे झालं
उघडे तोवर छत्री
मला का रे भिजवलं...

नको आत्ता रडू
जवळ जरा ये....
छत्री घेतली नवी
थांब तुला दाखवते

........अमरीश अ. भिलारे.


|