Namaskar mitrano,
Marathi chat madhe aaple swagat aahe, kahi lokanchi complaint aahe ki tyana chat box disat nahi, tar sarvani lakshadya ki tumchyakade Flash player installed aahe ani tumhi Mozilla Firefox use karat aahe, karan baki sarva browser madhe chat box cha problem aahe.........

Dhanyavad

स्पर्धा करतो हा मी वा-याशी

Posted on Wednesday, December 23, 2009 by Ajit


यमक, प्रास जरी जुळत नव्हते
नियम तेव्हा हे छळत नव्हते
किती पाहिल्या किती वाचल्या
तुझ्या कविता होत्या "आपल्या"

पहिलीच ती सुरूवात होती
शब्दात तुझ्या नई बात होती
पाहिली न होती दुनिया अजूनी
इथलाच दिवस आणि रात होती

कसे कुठे तुझे शब्द ग फिरले
दिले गेले ते शब्द का विरले
फिरले विरले ते मनात जिरले
शब्द तुझ्या कवितेत न उरले

फिरून आलो मग बाहेर मी ही
खुशाल खेळलो लय तालाशी
कशास पचवू फुसक्या गमजा
स्पर्धा करतो हा मी वा-याशी


Kiran

अस माझ प्रेम असाव ..

Posted on by Ajit


जगाच्या दूर ,
एका प्रेम नगरीत ,
आपल छोट एक घर असाव ,
अस माझ प्रेम असाव ...

तू माझी रोज वाट पहावी ,
आणि मी हळूच येवून ,
तुला मिठीत घ्याव ,
अस माझ प्रेम असाव ...

मी उशिरा का आलो म्हणून रुसाव ,
मी मग तास तास तुला मनावाव,
आणि मग हळूच तू हसून द्याव ,
अस माझ प्रेम असाव ...

प्रेमाच्या नभा खाली ,
प्रेमाच्या धर्तीवर ,
प्रेमात रंगलेलो फक्त दोघे असावेत ,
अस माझ प्रेम असाव ...

प्रेमाच्या वर्षेत ,
चीम्भं भिजून ,
दोघे आनंदात गाणे गावेत ,
अस माझ प्रेम असाव ...

तुला उदास बघून ,
माझे अश्रू पहिले निघावेत ,
अस माझ प्रेम असाव ...

जीवनाच्या प्रत्येक क्षणात ,
तुझ्या सुखासाठी मी झटाव,
अस माझ प्रेम असाव ...

आपल्या चहू बाजूनी प्रेम , प्रेम आणि फक्त प्रेमाचा वास असावा ,
अशी ती नागरी असावी , अस माझ प्रेम असाव ...

$uMe$h


|