Namaskar mitrano,
Marathi chat madhe aaple swagat aahe, kahi lokanchi complaint aahe ki tyana chat box disat nahi, tar sarvani lakshadya ki tumchyakade Flash player installed aahe ani tumhi Mozilla Firefox use karat aahe, karan baki sarva browser madhe chat box cha problem aahe.........

Dhanyavad

एकदा प्रेम करून बघायचंय.....

Posted on Wednesday, September 30, 2009 by Ajit


प्रेमाच्या सोनेरी हसऱ्या क्षणांना, मला एकदा अनुभवायचं
हसत प्रेम करता करता तिच्याशी थोड भांडायचंय .................

फुल तिला हवे म्हणून, झाडावर मला चढायचंय
पडशील अरे हळूच , अस ओठातुन त्या ऐकायचं ..................

परीराणीला माझ्या , गाडीवरून फिरवायचंय
जोरात गाडी चालवून , थोडास घाबरवायचं...........................

थेटर मध्ये मला, सोबत तिच्या बसायचंय
फिल्म ठेऊन बाजूला , तिलाच मनसोक्त पहायचंय.................

दिवस रात्र बोलून ,ब्यालंसला तिच्या संपवायचंय
गुपचूप रीचारज करून, माहितच नाही मला अस दाखवायचंय....

तिच्या प्रेमळ कुशीत ,मन मोकळं करायचंय
दुखाना तिच्या सर्व , आपलंसं करायचंय ...........................

कोवळ्या तिच्या पावलान खाली, फुलांना मखमली पसरवायचंय
सर्व सुखांना विश्वातील , तिला आणून द्यायचंय ...................

आघाव पण केला तर , प्रेमळ पणे रागवायचंय
चढलाच राग नाकावर तर गोड गोड बोलून समजवायचंय.........

तिच्या नाजूक भावनांना मला सर्वस्वी जपायचंय
येत नसताना जोक सांगून थोडासा तिला हसवायचंय ............

अभिनंदन गायकवाड 14-08-09..

किती दिवस झाले मी तिचं तोंड नाही पाहिलं.

Posted on Monday, September 28, 2009 by Ajit


आज माझ्या प्रेमाला वर्ष पूर्ण झालं ;
काय सांगू तुम्हाला ...
किती दिवस झाले मी तिचं तोंड नाही पाहिलं..!!!!!!

जेव्हा पण भेटायची मला , तीच कालीज भरून यायच ,
तासन-तास आम्ही फ़क्त एकमेकांनाच पहायच,
मग डोळ्यातील समुद्राला उधाण भरून यायच,
डोळे सोडून-काठ मोडून ,अश्रु बनुन वहायच,
खुप दिवस झाले ते पाणी नाही वाहिलं..||१||

माझी आठवण आली की ती मला फ़ोन करायची,
मग माझ्या तोंडातील प्रत्येक शब्दासाठी झुरायची,
बोलता बोलता अचानक हमसून रडायची,
आणि मलाही स्वतःची भ्रांत पडायची,
अजुन बोलायच होत जे दुःख मनात राहीलं..||२||

मला बघताना ती डोळे मिटून घ्यायची,
का म्हणुन विचारल्यावर एकच उत्तर द्यायची,
"तुला माझ्या डोळ्यामधे साठवून ठेवयाचय ",
असं म्हणुन स्वतःच सैरभैर व्हायची,
तिच्या आठवनिंनी मला खुप खुप त्राहिलं..||३||

तिच्या डोळ्यातील अधीरतेची कारण जेव्हा कळली,
प्रत्येक अवघड कोड्याची उत्तरं तेव्हा जुळली,
'तुझी वाट बघेन , भेटू पुढच्या जन्मी ',
असं बोलून तिची प्राण ज्योत मावळली,
याच हातांनी महिन्यापूर्वी तीच शरीर दाहिलं..||४||

=========विक्रम वाडकर=========

कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये

Posted on Sunday, September 20, 2009 by Ajit


कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये
की आपल्याला त्याची सवय व्हावी
तडकलेच जर ह्र्दय कधी
जोडतांना असह्य यातना व्हावी

डायरीत कुणाचे नाव इतकेही येवू नये
की पानांना ते नाव जड व्हावे
एक दिवस अचानक त्या नावाचे
डायरीत येणे बंद व्हावे

स्वप्नात कुणाला असंही बघु नये
की आधाराला त्याचे हात असावे
तुटलेच जर स्वप्न अचानक
हातात आपल्या कहीच नसावे

कुणाला इतकाही वेळ देवू नये
की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावा
एक दिवस आरशासमोर आपणास
आपलाच चेहरा परका व्हावा

कुणाची इतकीही ओढ नसावी
की पदोपदी आपण त्याचीच वाट बघावी
त्याची वाट बघता बघता
आपलीच वाट दिशाहीन व्हावी

कुणाची इतकेही ऐकू नये
की कानात त्याच्याच शब्दांचा घुमजाव व्हावा
आपल्या ओठातूनही मग
त्याच्याच शब्दांचा उच्चार व्हावा

कुणाची अशीही सोबत असू नये
की प्रत्येक स्पंदनात ती जाणवावी
ती साथ गमवण्याच्या केवळ भीतीने
डोळ्यात खळकन अक्ष्रू जमावी

कुणाला इतकाही माझा म्हणू नये
की त्याचे ' मी पण ' आपण विसरुन जावे
त्या संभ्रमातून त्याने आपल्याला
ठेच देवून जागे करावे

पण, पण
कुणाच्या इतक्याही दूर जावू नये
की आपल्या सावली शिवाय सोबत काहीच असु नये.

एक दिवस असा होता की

Posted on Thursday, September 3, 2009 by Ajit


एक दिवस असा होता की
कुणीतरी माझ्या फोनची वाट पहायचं
स्वतःच फोन करुन मनसोक्त बोलायचं
त्या गोड गप्पामध्ये रंगायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी तासनतास माझ्याशी गप्पा मारायचं
गप्पा तशा कमीच पण फ्लर्ट जास्त व्हायचं
मनमोकळेपणानं सर्व काही सांगायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी मला भेटण्यासाठी बोलवायचं
वेळेअभावी कामामुळे कधीच नाही जमायचं
फोनवर मात्र तीन तीन तास बोलायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी माझ्यासाठी झुरायचं
पण माझं यातनामय जीवन त्याला कसं सांगायचं
मग काय, विहिरीतील कासव बघायचं

आज दिवस असा आहे की
कुणीतरी विणाकारण मला टाळायचं
नसलेलं काम सबब म्हणून सांगायचं
वेळ देऊनही फोन नाही करायचं

आज दिवस असा आहे की
मी माझं नातं मनापासुन जपायचं
मिळालेल्या वागणुकितुन मन मात्र दुखायचं
पण माझं हे दु:ख कोणाला कळायचं

आज प्रश्न असा आहे की
का कुणाशी स्वार्थासाठी नातं जोडायचं
का प्रेमाचं नाव घेऊन ताळ तंत्र सोडायचं
का स्वतःचं व दुस-याचं जीवन भकास करायचं

मित्रा, आपल्याल नाही हे जमायचं
दु:खातही आपण मात्र हसायचं
कधी कधी एकांतजागी खुप खुप रडायचं
चेह-यावर चेहरा लावुन जगायचं


|