Namaskar mitrano,
Marathi chat madhe aaple swagat aahe, kahi lokanchi complaint aahe ki tyana chat box disat nahi, tar sarvani lakshadya ki tumchyakade Flash player installed aahe ani tumhi Mozilla Firefox use karat aahe, karan baki sarva browser madhe chat box cha problem aahe.........

Dhanyavad

कोसळणाऱ्या त्या चिंब पावसात

Posted on Friday, April 24, 2009 by Ajit


कोसळणाऱ्या त्या चिंब पावसात
:
रात्र बरीच झाली होती
पाऊसही कोसळत होता
झालो क्षणातच एकरूप आम्ही
कोसळणाऱ्या त्या चिंब पावसात....
:
खुप समजावले मी तिला
नको भिजुस या क्षणाला
एकायचेच नव्हते तिला माझे
कोसळणाऱ्या त्या चिंब पावसात....
:
राहिलो एकटाच आडोशाला उभा
पण पाहत होतो मी फक्त तिलाच
भर पडत होती तिच्या सौंदर्यात
कोसळणाऱ्या त्या चिंब पावसात....
:
अशाच साठवून ठेवीन तुझ्या आठवणी
मी माझ्या स्वप्नांच्या डायरीत
तू आणि मी एकत्र असताना
कोसळणाऱ्या त्या चिंब पावसात....
:
--हरिष मांडवकर
२४-४-२००९.

कोल्हापूर- नाद नाही करायचा...

Posted on Friday, April 10, 2009 by Ajit



रस्त्यावर पडलं कुणी चुकून तर अजुनही लोक उचलायला धावतात,
आणि आपली कितीही सुंदर असली तरी आम्हाला महाद्वारच्याच पोरी भावतात

मर्दानी शस्त्र आणि मर्दानी खेळ घराघरात जपले जातात,
अरे चौकातुन तर सोडाच पण महापालिकेतही त्याची प्रात्यक्षिके होतात

'गोकुळ' कितीही स्वस्त झालं तरी 'कट्यावरच' गर्दी असेल,
आणि तांबड्या पांढ-या रश्श्यावरती पिळदार मिशी तुटून पडेल

'थेम्स' च्या काठी बसलो तरी 'रंकाळ्याचीच' आठवण असेल,
'रॅप' कितीही ऐकले तरी 'लावणी' ऐकुनच मान डुलेल

'केक- पेस्ट्रीज'कितीही खा, त्याला इथल्या गुळाची चव नाही,
आणि 'आडिडास' च्या शूजला इथल्या 'पायताणाची' सर नाही

अरे कितीही मोठे झालो तरी तोंडात झणझणीत शिवी असेल,
आणि फाडफाड इंग्रजी बोललो तरी रांगडी कोल्हापुरीच हवी असेल

'क्रिकेट- फुटबोल' काहीही येवो 'कुस्तीचा' मान त्याला नाही,
आणि इंग्लंडच्या लंडनलाही 'कोल्हापूर'ची शान नाही

तुझे नि माझे नाते.. !

Posted on by Ajit


तुझे नि माझे नाते कसले?.. मजला उमगत नाही..
या जन्मीचे की गत जन्मीचे?.. काही समजत नाही...

काय नाव मी देऊ याला? सखे तुला तरी कळेल का?
गूढ-गहन प्रश्नाचे उत्तर.. सांग कधि ग मिळेल का ?

अवचित एका वळणावरती.. गाठ आपुली ही पड्ली...
निमिषा मध्ये क्षणाक्षणाची.. रेशीमनाती बघ जुळली..

सत्य प्रेम.. शिव ही प्रेम.. प्रेमच सुंदर आहे..
क्षणीक नश्वर जगती अंति.. प्रेमच अमर आहे....

प्रीत असे या अवनी वरती.. कोरिव सुंदर लेणे..
शिल्पी याचा ईश्वर.. हे तर.. परमेषाचे देणे...

त्याच्या मर्जी शिवाय जगती.. पान ही हालत नाही..
त्याच्या इच्छेपुढ्ती आपुले.. काही चालत नाही...

दुःख- वेदना क्षणाक्षणाला.. देऊन नियति जरि हसते...
तिच्याच करणी मध्ये खरे तर..भलेच आपुले परि असते..

नात्या मध्ये आपुल्या राणी.. अवचित आता मज कळते...
गूढ -गहन प्रश्नाचे कोडे.. अलगद-भरभर उलगडते..

चांगलं-वाईट, चुक-बरोबर? कशाला प्रश्नात पडायचे..
तुझ्या नि माझ्या सहवासाच्या.. क्षणाक्षणाला.. जपायचे..


|