Namaskar mitrano,
Marathi chat madhe aaple swagat aahe, kahi lokanchi complaint aahe ki tyana chat box disat nahi, tar sarvani lakshadya ki tumchyakade Flash player installed aahe ani tumhi Mozilla Firefox use karat aahe, karan baki sarva browser madhe chat box cha problem aahe.........

Dhanyavad

शाळा...परत एकदा.

Posted on Tuesday, June 25, 2013 by Ajit



ABCDEFGHIJKLMNOP....
वर्गांच्या बाकावर नाव लिहीलेली,
शाळेच्या बस मध्ये मस्ती केलेली .
कॅालेजला मस्तींची होतात लफडी,
नावांच्या जागेवर प्रेमाची कोडी.
शाळेत रोज जायची वेगळीच होती मजा ...
पुन्हा मला शाळेत जाऊ द्या ना जरा .....

शाळेचा पहिला दिवस आठवतो ...
पावसानी भिजलेले रस्ते आणि शाळेत जायचे म्हणून भिजलेले डोळे,
सगळं काही नवीन,
नव्या बाई , नवा वर्ग... धावत जाऊन पकडलेला मागचा बेंच ....
आणि मागच्या बेंच वरून पाहिलेली
पोरररररर
पहिल्या रांगेतली .....
वही खरडत बसणारी ..
मागे.....
सारे अवली त्यांच्या वह्या चोरणारी...
कॉलेजमध्ये सारे बेधुंद
वारे ...
क्लास रूम मध्ये टीचर, कट्यावर सारे ..
टीचर ने रागावले किती तरी वेळा..
पुन्हा मला शाळेत जाऊ द्या ना जरा .....

ये भाईईई.....
पहिली पकडलेली कॉलर.. पहिला दिलेला धक्का.
आणि मोठ्यांमध्ये राहून खूप वेळा ऐकलेली ....
शिवीSSSSSS....
पहिली वहीली थोडीशी अडखळलेली .....
पोरींनी केली चुगली,
पण मित्रांनी तारीफ
केली ...
पहिल्या शिवीचे ते लहाणपण मला परत करा....
पुन्हा मला शाळेत जाऊ द्या ना जरा .....

प्रार्थना शाळेतच म्हटली जायची,
रिकाम्या जागा भरा,
जोड्या लावा,
हे प्रश्न शाळेत किती सोपे वाटायचे.
आणि आता काय सविस्तर उत्तर द्या ... आणि शास्त्रीय कारण हि द्या...
आणि हे प्रश्न आले कि आठवते ..
परीक्षा ती शेवटची ..............
शेवटची ठरलेली .......
प्रश्नाला त्या शेवटच्या.......
शाळा हि सरलेली....
कॅालेजला होतात पासिंगचे झोल....
हरवल्या छड्याना भिंतीचे तोल ..
तेव्हा लहानसे किती प्रेमळ होते जग ....
उगाच मी मोठा झालो,
वाया गेलो सारा..
पुन्हा मला शाळेत जाऊ द्या ना जराSSSSSSSS ....


|