Namaskar mitrano,
Marathi chat madhe aaple swagat aahe, kahi lokanchi complaint aahe ki tyana chat box disat nahi, tar sarvani lakshadya ki tumchyakade Flash player installed aahe ani tumhi Mozilla Firefox use karat aahe, karan baki sarva browser madhe chat box cha problem aahe.........

Dhanyavad

आठवणीतल्या आठवणी

Posted on Friday, October 2, 2009 by Ajit


कामतीच्या रस्त्यावरची
धूळ उडवत तू शहराकडे
निघालीस
चवथ्या बाळान्तपणासाठी,
मी टाहो फोडला
तुझ्याशिवाय
असा एकटा कधी राहिलो
नव्हतो गं !
तुही भरल्या डोळ्यांनी
मागे मागे पहात
जड झालेली पावले
धुळीत
रुतावत चालू लागलीस ....

ढेकळांच्या काळ्या
रानात मी उष्ण आश्रू
गाळत होतो
अन् तू
धुळवाट ओली करत
अस्पष्ठ होत
राहीलीस....

तेव्हापासून तुला
जडलेला अस्पष्ठतेचा
शाप
तू कधीच सोडला
नाहीस....

बाप तुझ्या तोंडावर
दहाच्या तीन नोटा
फेकून देशांतारास
गेला
तू मात्र चार पिल्ले
कुशीत घेवून
सारवलेल्या जमिनीचे
पोपडे निरखू लागलीस !

कधी म्हणाली होतीस
बापाने रुखवतात
कुंकवाचा करंडा दिला
नाही !
म्हणून चिमटीतले
कुंकू हवेत पसरते
कधीतरी मग कुंकवाआडचे
मेण दिसते
हिरवट....

आज त्याचा अर्थ लागतो आहे .......

विजयकुमार.............

१६.०९.२००९ ,मुंबई


|