शुभेच्छा मी सर्वाना देतो
भरभरुनी त्या सर्वांच्या घेतो
दीपावली मी आनंदाने जागवतो
पाउस तो अंधारात पेटवितो
वचन प्रेमाचे बहिनीस देतो
लीन सुखात सहज होतो
शुभ दीपावली पुन्हा म्हणतो-------------
कवी
निलेश बामणे
Marathi chat madhe aaple swagat aahe, kahi lokanchi complaint aahe ki tyana chat box disat nahi, tar sarvani lakshadya ki tumchyakade Flash player installed aahe ani tumhi Mozilla Firefox use karat aahe, karan baki sarva browser madhe chat box cha problem aahe.........
Dhanyavad
शुभ दीपावली
9 comments Filed Under:
आई फ़क्त तुझ्यासाठी...
आई फ़क्त तुझ्यासाठी.......
बांधून मनाशी खुणगाठी
निघालो धावत स्वप्नांपाठी
कचरते मन, अडखळते पाउल
आई फ़क्त तुझ्यासाठी.......
कशी राहशील सोडून मला
सतावेल आठवण क्षणाक्षणा
रडन्यासाठी तुला आता
न लागेल कांद्याचा बहाणा
bus Stop वर तुझा हात सोडवताना
माझं उसणं अवसाण...गळून गेलं होतं
शेवटच्या क्षणी जर बाबांनी तुला माघे खेचलं नसतं...
त्या Bus एक सीट नक्कीच रिकामं गेलं असतं...
प्रत्येक वेळी तुला फोनवर बोलताना
गळा अगदी दाटून येतो.....
थांबवून हुंदका कसाबसा मी..
balance संपल्याचा बहाणा करतो..
कळुन ही न कळल्यासारखी तू..
मग माझंच सांत्वन करतेस...
पण मलाही माहित आहे आई..
फोन ठेवताच तू रडतेस...
इथे रोज pizza आणि burger खाताना...
तुझ्या भाकर भाजीची आठवण येते..
अशी तुझी आठवण काढून जेवताना मग..
का कुणास ठावूक..प्रत्येक गोष्ट खारटचं लागते...
ऑफिसातुन थकुन घरी आल्या नंतर, तोंडातून
"आई चहा दे गं " अगदी सहज निघून जातं
आणि तू इथे नसल्याचं लक्षात येताच...
घर अगदी भकास भकास वाटू लागतं...
चहा पिण्याची इच्छा जाते मरून...
शरीर बोजड अन मन खिन्न खिन्न होतं.....
थकलेलं माझं शरीर, लगेचच...
स्वताःला निद्रेच्या ताबी देतं...
सताड जागं माझ मन मात्र, तुझा ..
केसांतून फिरणारा...गोंजारणारा हात शोधत राहतं...
सकाळी उठल्यानंतर पुन्हा मगं
माझी रोजचीच धावपळं सुरू होते...
आणि मग मनात विचार येतो...
तू असलीस की सर्व कसे सुरळीत होते...
अशा या माझ्या busy दिनचर्येत...
तुझी उणीव जाणवत राही क्षणोक्षणी
धावत येईन परत तुझ्यापाशी आई,
पहिली संधी मला मिळता क्षणी....
सरतील दिवस बघता बघता
परत येईन मी तुझ्याचपाशी...
ठेवून पायावर डोई, मागेन तुझी माफ़ी
सोडून तुला नाही जाणार..पुन्हा कधीही मी परदेशी....
1 comments Filed Under:
पुन्हा ती भेटली, तेव्हा..
थांबल्या दिशा, थांबले ऋतू
थांबला जणू काळ तेवढा
काळ जेवढा.. थांबलीस तू !
भासलीस तू कापरापरी,
काजळी जणू.. काजळावरी
कंप पावती खोल पापण्या
सांगती तुझी बातमी खरी
स्मित मोजके, बोलणे कमी
त्याच चौकश्या, तीच बातमी..
जे मनात ते, बोललो कुठे?
होत राहिले हेच नेहमी..
हासणे तुझे.. स्फुंदणे तुझे..
आळसावणे.. रंगणे तुझे..
त्या कळा कुठे? रंग ते कुठे?
लोपले कुठे.. चांदणे तुझे?
शब्द का मुके? मौन बोलके..?
बोल ना जरा, बोल नेमके
सांग कल्पना, सांग शक्यता
सांग वेदना.. सांग हुंदके!
सांग ना तुला, टोचते कुठे?
काय वाटते? बोचते कुठे?
बोलतेस तू त्या तटावरी..
या तटावरी पोचते कुठे?
तीच तू जरी.. तोच मी जरी
वेगळे किती वाटतो तरी !
एवढी कशी आज अंतरे?
वाढली कधी, सांग ही दरी?
पोकळी कधी ही भरायची?
उत्तरे कशी सापडायची?
प्रश्न राहिले.. आपल्यामधे
वेळ जाहली..तू निघायची..
.
.
.
काय घेतले? काय मी दिले?
काय वाढले? काय छाटले?
आठवे अता एवढेच की..
एकटे मला.. फार वाटले !
एकटे मला फार वाटले !
-ज्ञानेश.
1 comments Filed Under:
आजकालचा चंद्र
आजकाल चंद्र पूर्वीसारखा हंसत नाही
पूर्वी तो दिसायचा
मामाच्या चिरेबंदी वाड्यातून
पूर्वी तो हंसायचा
लिंबोणीच्या झाडा मागून
पण......
आता मामा गेलाय
ग्रीन कार्ड घेऊन
दूरदेशी, परदेशात
तो चिरेबंदी वाडा
तो ही रहिलेला नाही
लिंबोणीचं झाड भूईसपाट करून
तिथं उभ्या राहिलेल्या
पंचवीस मजली इमारतीच्या
चौदाव्या मजल्यावरच्या
2BHK flatच्या खिड्कीतून
चंद्र दिसतो खरा
पण तो ओळ्खीचा वाटत नाही
आजकाल चंद्र पूर्वीसारखा दिसत नाही
आजकाल चंद्र पूर्वीसारखा हंसत नाही
-अशोक
(पूर्व प्रसिद्धी: दै. सकाळ: २०/०२/२००५)
1 comments Filed Under:
येरे येरे पावसा
येरे येरे पावसा
जवळ जरा ये....
छत्री घेतली नवी
थांब तुला दाखवते
मोग-याची फ़ुले
अन हिरवे हिरवे पान
लव्हेंडर कलर बघ
दिसते किती छान
बारीक सफ़ेद ठिपके
अन डौलदार झुल
पाहून माझी छत्री
तुला पडली ना भूल
मोठी आहे छत्री
कशी भिजवशील मला
मी नाही देणार
माझी छत्री कुणाला
आत्ता का रडतोस
अरे काय रे झालं
उघडे तोवर छत्री
मला का रे भिजवलं...
नको आत्ता रडू
जवळ जरा ये....
छत्री घेतली नवी
थांब तुला दाखवते
........अमरीश अ. भिलारे.
0 comments Filed Under:
अर्थ तुला कळूदे
दिवस उन्हाळ्याचा आहे तापलेला
पण जीवाची घालमेल उन्हामुळे नाही
आयुष्याचा वाटेवर जे वळण मी घेतलेलं
आपल्या सुखाचा गावी आपल्याला पोचवेल कि नाही
जुळलेली मनं कधी वेगळी होऊन धड-धडताना
कधी एकमेकां पासून लपवून ठोके चुकवताना
डोळ्यात नसलेलं हसू ओठांवर उमटताना
वाया जातंय जीवन विरहात जगताना
तुझा वाटेला डोळे लाऊन बसताना
प्रत्येक क्षणात विचारांच्या वादळाचा पाऊस
डोकं म्हणतं नको वेडा होऊस
पण मनातनं हाक येते... नको ना जाऊस
वादळापासून लपायला तुझा कुशीत आलो तर
तिथे पण केलंय एका वादळाने घर
हि वादळे शांत होणार कधी
वाहणार कधी शांतपणे निथळ प्रेमाची नदी
आज माझे शब्दही वाऱ्यावर भिरभिरतायत
वावटळीचा आवेगात आपला अर्थ हरवतायत
अर्थ पूर्ण हरवायचा आत वावटळ सरूदे
शब्दांचा ह्या माझ्या अर्थ तुला कळूदे… अर्थ तुला कळूदे…
3 comments Filed Under:
ओठात माझीया मी गातो तुझेच गाणे
ओठात माझीया मी गातो तुझेच गाणे
ओठास ओठ दे तू गाइन मी मुक्याने
प्रिती तुझी अबोली - मी बदनाम बोलवाने
लाजून बोल ना तू- जे म्हटले मुक्या क्षणाने
ओठात माझिया हे - शब्दा विनाच गाणे
ते ओठ ओठ नहीं ते - झाले तुझेच देणे
अंतर्यात गीताच्या - सगळी अंतरे बुडाली
बघ ध्रुव पदावरी आहे - फिरुनी तूझेच येणे
मयुरेश साने २८ -एप्रिल -2010
0 comments Filed Under:
कॉलेज लाइफ़ माझ......
"कॉलेज लाइफ़ माझं "
कँटीन मधला चहा आणि
चहा सोबत वडा पाव
पैसे कुठ्ले खिशात तेव्हा
उधारीचचं खातं राव !
कट्ट्यावर बसणं लेक्चर चुकवून
आणि पोरींची चेष्टा करणं
दिसलीच एखादी चांगली तर
तिला लांबूनच बघून झुरणं !
बसलोच चुकून लेक्चरला तर
शेवटचा बाक ठरलेला
कुणाच्या तरी वहीतलं पानं
आणि पेन सुध्दा चोरलेला !
परिक्षा जवळ आली
कि मात्र रात्री जागायच्या
डोळ्यात स्वप्नं उद्याची
म्हणून झोपाही शहाण्यासारख्या वागायच्या !
पूर्ण व्हायचं एक वर्तुळ
एक वर्ष सरायचं
पुन्हा नव्या पाखरांसोबत
जुनं झाड भरायचं.
अशी वर्तुळ भरता भरता कळलं
अरे कागदच भरला !
वर्तुळ झाल्या कागदाला
फ़क्त सलाम करायचा उरला !!
पुन्हा नविन रस्ता
पुन्हा नविन साथी
जुन्या रस्त्याच्या , प्रवासाच्या
फ़क्त आठवणीच हाती !!!!!
0 comments Filed Under:
ती नवीन नवीन असते तेंव्हा
ती नवीन नवीन असते
तेंव्हा दिसतं एखादं फूल
कोणी काही विचारलं की
तेही होतं लगेच गूल....
अगं नाव तरी सांग
म्हटलं की...नुसतं हुम्म करणं
सारखं सारखं तेच
मग होतं बघा अजिर्ण
कधी दिसतं दवबिंदू
कधी वाहतो गार वारा
कधी कधी वाटतं तिचा
विचार न केलेलाच बरा
कधी सूर्यफूलाचा मळा
कधी हिरवंगार रान
पाहून ते सारं असं
कोणीही हरपेल भान
कधी ओघळणारा अश्रू
कधी काळजातून येणारं रक्त
कसं समजायचं तिला
काय करायचंय व्यक्त
उडणारी फुलपाखरे मनाला
ओढ लावून जातात
खरचं कशी असेल ती
याची उत्तरे बाकी राहतात
एक दिवस अचानक
इमेज गायब होते
आपणच फसलोय
हे आपल्या लक्षात येते
काही दिवस मग प्रोफ़ाइल
तो उघडला जात नाही
मी काढून टाकतो तिला
ती मैत्रिण राहत नाही
अचानक एकदा तिची
पुन्हा आठवण येते
अशीच मित्राच्या लिस्ट्वर
अलगद नजर जाते
त्याच्या बुक मध्ये
तिचेच स्क्रेप्स असतात
हसू येतं गालात एकदम
साले असे कसे फसतात..?
त्यालाही मग दिवसा
तसेच तारे दिसतील
माझ्या नंतर तो अन
आणखी किती असतील...?
0 comments Filed Under:
एक मुलगी मला आवडली
कॉलेजमध्ये असताना
एक मुलगी मला आवडली
तुम्हाला सांगतो ती इतकी आवडली ना
कि चोहिकडे मला फक्त तिच दिसू लागली..
वेळ वाया जात आहे किती
तिला मनातले सांगेनच ह्याची नाही शाश्वती
पण मनात होती भीती म्हणाली असती
मित्रा, हे तर होतय फारच अति
कॉलेज संपले
नोकरी सुरू झाली
तसा थोडा तिचा विसर पडला
अन अहो भाग्य!! आज ति चक्क समोर आली
आली होती माझ्या कंपनीमध्ये
मुलाखत देण्यास
आणि मि होतो तिथे
तिची मुलाखत घेण्यास
मुलाखत सोडली
आणि गेलो कॉफी प्यायला
विचारले तिला आहेस एकटी
कि आहे कोणी तुझा दादला..?
तिचा बोलका चेहरा सर्व काही सांगून गेला
जणू चातकाचा कौल पावसाने स्विकारला
तो चेहरा माझी ओढ अजुनच वाढवून गेला
आणि माझ्या मनाचा मोर पिसारा फुलवून तिथेच नाचू लागला.
मनाने पुढाकार घेतला
आणि वाणिने त्यास प्रतिसाद दिला
एकदा सांगितले तिला माझ्या मनातले
आणि केले इतक्या वर्षाचे अस्वस्थ मन मोकळे..
ति हलकेच लाजली आणि तिच्या गालावरील खळी
माझ्या अंतर्मनाने ओळखली
ति म्हणाली किती वेळ लावलास तु…?
कॉलेजमध्ये असताना मला पण आवडत होतास तु…
अरे नशिबा कसला हा खेळ खेळलास
युगान युग दुर ठेवून शेवटी आम्हास मिळवलास
0 comments Filed Under:
गुढी पाडवा...
पुन्हा तसेच वर्ष
तरी मनास होतो
आज नवा हर्ष
उभारुन गुढी
करु दुख:चा व्यय
नव्या वर्षाला
नव्या सुखाचे ध्येय
जुन्या नव्या मित्रांची
लाभेल संगत
श्रीखंड पुरीची
आज रंगेल पंगत
मोठ्यांचा आशिर्वाद
लहानांचा जिव्हाळा
आपल्याच माणसांचा
हा आपलाच सोहळा
वाहतील चोहीकडे
आनंदाचे वारे
लाभो तुम्हास
सुख समाधान सारे
नव्या वर्षात होवो
पूर्ण सा-या इच्छा
नुतन वर्षाच्या तुम्हास
हार्दिक शुभेच्छा...!!
.........अमरीश अ. भिलारे.
0 comments Filed Under:
प्रेम कि मैत्री....???
तुझ्याशी खूप बोलावे वाटते
पण शब्द चुकण्याची भीती वाटते
तुझ्याशी खूप मैत्री करावी वाटते
पण विरहाची भीती वाटते...
.
तुझ्या खूप जवळ यावे वाटते
पण तोल सुटण्याची भीती वाटते
तुझा तो मन भुलविणारा चेहरा
मला अस्वस्थ करतो
पण त्याचे उत्तर देण्याची भीती वाटते...
.
तुझ्या सहवासात मी नाही याची उणीव भासते
पण तू माझ्या आयुष्यात आहे याची
मला सतत जाणीव असते
तुझी स्तुती शब्दात करावी वाटते
.
पण तुझ्या पुढे शब्द अपुरे पडतात....
तुझ्या पुढे जग सोडावे वाटते
पण समाजाची भीती वाटते
तुझ्या वर प्राण अर्पण करावा वाटतो
पण आई वडिलांची काळजी वाटते....
.
तुझ्या याच गुणांवर मी प्रेम करतो
पण तुला सांगण्याची भीती वाटते....
तुझी माझी मैत्री अशीच सुगंधी राहो
अशी मी जन्मो जन्मी प्रार्थना करतो
.
तूच सांग मला हे प्रेम आहे कि मैत्री
तुला काय वाटते....???
2 comments Filed Under:
आज असे वाटले........
आज असे वाटले, खुप खुप रडावे,
कोणास ठाऊक का पण, देवाचा पाया पडावे.
आज असे वाटले, वेड माला लगावे,
मग मी मनमोकले वेड्यासारखे हसावे,
आज असे वाटले, या अंधारातील जग्नायातुना बाहेर पडावे,
मन सारे मोकले करून उंच उंच उडावे.
आज असे वाटले, खुप खुप कही खावे,
मी पण बाकि जनंसरखे जाड जुड़ वहावे.
आज असे वाटले,मी पण स्वप्ना बघावे,
मनसोक्त पखारासरखे या विश्वायत बगादावे.
आज असे वाटले,तुझाशी भरपूर बोलावे,
अणि बोलता बोलता सारे आयुष्य सरावे.
आज असे वाटले,की मी तुझाची वाट पाहत राहिले,
आणि त्यामुले आयुष्यात बराच काही सोसले.
आज असे वाटले,की अत तरी मी तुला विसरावे,
अत तरी मी पुन्हा नव्याने जगावे,
अत तरी मी पुन्हा नव्याने जगावे.
2 comments Filed Under:
माझ्यापेक्षा २ वर्ष लहान आहेस रे तू बाळा
आज पुन्हा तेच जाहले
फूल प्रितीचे मनी उमलले
तुझ्या त्या एका वाक्याने
मन माझे फूलपाखरू जाहले
मित्र म्हणून राहताना
तुझे मन माझ्यात गुंतले
रोज फोनवर बोलताना
तू मला जिंकले
म्हणालास
"आवडतो तुझा सहवास
आवडत तुझ बोलण
तुझ्या प्रेमात आकंठ बुडालोय मी
माझा न राहिलोय मी
जाणीव आहे मला
आपल्यातल्या अंतराची
पण माझ्यालेखी
त्याचे महत्त्व नाही
प्रेम करतो मी तुझ्यावर
घेशील का समजुन वेडया मनाला
दुसरे तिसरे काही नाही
तुझी साथ हवी फक्त मला"
कळते रे सार मला
पण कशी समजावू तुला
कशी रे 'हो' म्हणु
माझ्यापेक्षा २ वर्ष लहान आहेस रे तू बाळा
*****स्वप्नवेडी*****
16-02-2010
0 comments Filed Under:
"सांग तू माझी साथ देशील काय?"
सांग तू माझी साथ देशील काय?
उंच उंच आकाशात, चांदण्याच्या प्रकाशात
गप्पांचा खेळ तू खेळशील काय?
सागराच्या किनारी, वाट पाहत एकाकी
वाटेकडे डोळे लाऊन तू बसशील काय?
हिरव्यागार रानामध्ये, पाखरांच्या गाण्यामध्ये
हाकेस साद तू माझ्या देशील काय?
दूर -दूर रस्त्यावर, पत्रातील पत्त्यावर
अंगणात सडा शिंपीत दिसशील काय?
चींब-चींब पावसामध्ये, धूसर अशा दिवसामध्ये
मधुर-मधुर गीत तू गाशील काय?
सुगंधी बगीच्यात, दरवळणाऱ्या गंधात
गुलाबाचे फुल तू होशील काय?
बावरलेल्या डोळ्यांतून, पापण्यांच्या भाषेतून
एकदातरी माझ्याशी तू बोलशील काय?
सांग तू............?
संदीप शेलार
३१ डिसेंबर २००८
सातारा,महाराष्ट्र .
0 comments Filed Under:
तेव्हा आले सगळे बघायला
नव्हत कोणी डोकावून बघायला,
आज जेव्हा श्वासच उरला नाही,
तेव्हा आले सगळे बघायला,
नव्हत कोणी रडायला माझ्याबरोबर,
तेव्हा, नव्हत कोणी हसायला,
आज जेव्हा शांतपणे झोपलोय मुक्त होऊन,
तर, आले सगळे टाहो फोडायला,
आज पहा माझा काय थाट!
लोक जमतील मला अंघोळ घालायला,
आयुष्यभर नाही पाहिल कधी कापड,
आज नवीन पांढरे-शुभ्र वस्त्र मला नेसायला,
जेव्हा उपाशी होतो रात्रों-रात्र,
नव्हत कोणी एक घास खाऊ घालायला,
आज जेव्हा भुक मेली माझ्याच बरोबर माझी,
ठेवलाय माझ्यासाठी त्यांनी भात शिजायला,
जन्मभर लाथा मारून गेले जे मला,
आज आले माझ्या पाया पडायला,
शब्दाचाही आधार नाही दिला ज्यांनी,
आज चौघे-चौघे आले मला धरायला,
आज काय किम्मत 'त्या' रडण्याला?,
आज काय किम्मत 'त्या' छाताड झोडण्याला?,
ज्या घरात रहातच नाही आज कोणी,
आज काय किम्मत 'ती' घरपूजा करण्याला?
0 comments Filed Under:
