आय लव्ह यु
फोन आला त्याचा
मिटींगमध्ये आहे
उशीर होईल
आज
गड्बडीत का होईना
म्हणाला
आय लव्ह यु
पुन्हा फोन आला
आवाज नशीलाच होता
बाजुला खिदळान्य़ाचा आवाज आला
बोलला काय बोलला
ऐकुच आले नाही
बहुतेक
शेजारी कानात सांगत होता
आय लव्ह यु
पुन्हा पुन्हा तेच भास
पुन्हा तोच आवाजa
प्रेत्येक वेळेस
परकेपणा वाढत होता
परकेपणात ही
आपलेपणा दाखवायला
ढोंगी म्हणत होता
मला
आय लव्ह यु
कल्पी
Marathi chat madhe aaple swagat aahe, kahi lokanchi complaint aahe ki tyana chat box disat nahi, tar sarvani lakshadya ki tumchyakade Flash player installed aahe ani tumhi Mozilla Firefox use karat aahe, karan baki sarva browser madhe chat box cha problem aahe.........
Dhanyavad
आय लव्ह यु .............
0 comments Filed Under: i love you
स्पर्धा करतो हा मी वा-याशी
यमक, प्रास जरी जुळत नव्हते
नियम तेव्हा हे छळत नव्हते
किती पाहिल्या किती वाचल्या
तुझ्या कविता होत्या "आपल्या"
पहिलीच ती सुरूवात होती
शब्दात तुझ्या नई बात होती
पाहिली न होती दुनिया अजूनी
इथलाच दिवस आणि रात होती
कसे कुठे तुझे शब्द ग फिरले
दिले गेले ते शब्द का विरले
फिरले विरले ते मनात जिरले
शब्द तुझ्या कवितेत न उरले
फिरून आलो मग बाहेर मी ही
खुशाल खेळलो लय तालाशी
कशास पचवू फुसक्या गमजा
स्पर्धा करतो हा मी वा-याशी
Kiran
0 comments Filed Under:
अस माझ प्रेम असाव ..
जगाच्या दूर ,
एका प्रेम नगरीत ,
आपल छोट स एक घर असाव ,
अस माझ प्रेम असाव ...
तू माझी रोज वाट पहावी ,
आणि मी हळूच येवून ,
तुला मिठीत घ्याव ,
अस माझ प्रेम असाव ...
मी उशिरा का आलो म्हणून रुसाव ,
मी मग तास न तास तुला मनावाव,
आणि मग हळूच तू हसून द्याव ,
अस माझ प्रेम असाव ...
प्रेमाच्या नभा खाली ,
प्रेमाच्या धर्तीवर ,
प्रेमात रंगलेलो फक्त दोघे असावेत ,
अस माझ प्रेम असाव ...
प्रेमाच्या वर्षेत ,
चीम्भं भिजून ,
दोघे आनंदात गाणे गावेत ,
अस माझ प्रेम असाव ...
तुला उदास बघून ,
माझे अश्रू पहिले निघावेत ,
अस माझ प्रेम असाव ...
जीवनाच्या प्रत्येक क्षणात ,
तुझ्या सुखासाठी मी झटाव,
अस माझ प्रेम असाव ...
आपल्या चहू बाजूनी प्रेम , प्रेम आणि फक्त प्रेमाचा वास असावा ,
अशी ती नागरी असावी , अस माझ प्रेम असाव ...
$uMe$h
0 comments Filed Under: asa maza prem asava
सगळीकडून कोसळतय आभाळ एकटेपणाचे
सगळीकडून कोसळतय
आभाळ एकटेपणाचे
अन ते दडलेत
झाडाआड
अजाणतेपणाची झूल पांघरून,
मी उदासगीत गात
प्रकाशकवडसे टिपत
रस्ता कापतो
जावून येऊन
काय त्या सावलीची सोबत.
तसं सारं शरीरच
भेगाळलयं
उन्मादी लस स्त्रवतेयं
सगळीकडून,
झाडत जाणारे सारे अवयव
अन
मनाने खचलेला मी
सारं सारं सामावून जाव ह्या
कराल अंधारात
अन जाणीव उरावी
काही नसण्याची.
तिनं देलेला डाग
आजही चरचरतो मनात
जेव्हा काहूर उठते
फेसाळण्याचे,
ती ढसाढसा रडलीपण होती
मला पदराआड घेवून
कुशीत असून नसल्याचं
ते एकटेपण
आजही उठवते झोपेतून,
घामेजला मी
दचकून पांघरुणात शिरतो,
आजूबाजूला कुणीच नसतं
ती सुध्दा.
विजयकुमार.........
०९.१२.२००९, मुंबई
0 comments Filed Under: sagli kadun kosaltay abhal ektepanacha
कुणीतरी अचानक आयुष्यात येतं
कुणीतरी अचानक आयुष्यात येतं
परक असूनही आपलसं होऊन जातं
खुप काही सांगयचं असतं खुप काही बोलयचं असतं
शब्दच फुटत नाही , सर्व काही मौनातच घडतं..
कुणीतरी अचानक आयुष्यात येतं
ह्रदयच्या कोप-यात त्याच नाव कोरल जातं
प्रत्येक क्षणी मन त्यालाच शोधत राहतं
त्याचा वाटेवर मन रोखु पहातं
सावली बनुन त्याच्या सोबत रहावस वाटतं
कुणीतरी अचानक आयुष्यात येतं
कळी प्रमाणे मन दपु पहातं
नजरेत मात्र गुलाबचे फुल उमलुन जातं
कुणीतरी अचानक आयुष्यात येतं
आणि आयुष्यच बनुन जातं
खरचं का; कोणी अचानक आयुष्यात येतं...???
0 comments Filed Under: kuni tari achanak aayushat yeta
ते पण एक वय असतं
ते पण एक वय असतं
2 comments Filed Under: te pan ek vay asta
