पुन्हा येशील तू आंब्याच्या झाडाखाली..
बुंध्याला टेकून बसशील
माझ्या आवडीची
मोरपंखी साडी नेसली असशील...
मी म्हणेन मनात
अजूनही छान दिसतेस.
रखरखीत उन्हात
आंबा तुझ्यावर गार गार छत्री धरेल..
तू असशील हरवलेली..विस्कटलेली
मी आणलेली पर्स.. मनालीहून,
तुझ्या हृदयाशी घट्ट धरलेली असेल
हळूच तू ती पर्स उघडशील..
त्यात असतील काही पत्रे..
ओलेत्या शब्दांनी लिहिलेली
काही फोटो...तुला मला धरून ठेवणारे
काही आठवणींची शिल्पे..
कायमची हृदयावर कोरले्ली
आखूडशिंगी पाऊस अचानक सुरू झालेला असेल
कुठूनसे अचानक वारे वाहतील
तुझ्या हातातील कागद उडून जातील
तुला धरायचे असतील ते सारे..
पण
पायात त्राण नसेल तुझ्या..
व्हीलचेअरकडे पाहतांना तुझे
डोळे भरून येतील
टपो-या शिडकाव्याचे
अरबीअश्वाच्या शुभ्र झुपकेदार शेपटासारख्या
मुसळधार पावसात रूपांतर झालेले असेल..
तुझे अश्रू त्यात मिसळून जातील..
पाऊस पाहून हरखणारा मी..
निखळलेले मोती वेचायचा प्रयत्न करीत असेन..
मलाही तेव्हां मग
अश्रू ढाळायचे असतील..
पण....पण..
अश्रूंना ही एक अस्तित्त्व असते ना..!
आणि
अश्रू ढाळायला ही हवे असते ना....!!
Marathi chat madhe aaple swagat aahe, kahi lokanchi complaint aahe ki tyana chat box disat nahi, tar sarvani lakshadya ki tumchyakade Flash player installed aahe ani tumhi Mozilla Firefox use karat aahe, karan baki sarva browser madhe chat box cha problem aahe.........
Dhanyavad
अश्रूंना ही एक अस्तित्त्व असते ना..!
0 comments Filed Under: chat, kavita, marathi
मित्राणो प्रेम करू नका प्रयत्न करा
मित्राणो प्रेम करू नका प्रयत्न करा
कारण प्रेमात हो किंवा नाही असते
प्रयत्नात ही नाहीतर ती असते
ती मिळाली तर ठीक नाहीतर तिची मैत्रीण सुंदर दिसते
मित्राणो मागणी घालू नका प्रपोज़ मारा
कारण मागणी नंतर एकतर पती श्रीराम नाहीतर राम राम
प्रोप्से मधे लवरशिप मिळाली तर ठीक
नाहीतर फ्रेंडशिपतर असतेच असते
फ्रेंडशिप मधे काही दिवसानी का होईना पोरगी फसते
ती मिळाली तर ठीक नाहीतर तिची मैत्रीण सुंदर दिसते
मित्राणो मूलीना सीरियस घेऊ नका टाइम पास करा
सिरियस व्हाल तर हमखास मराल
टाइम पास कराल तर राहाल ऑल टाइम सुखी
भेटली तर पा रो नाहीतर चंद्र मुखी
शेवटी पा रो आणि चंद्र मुखी कोणीच कायमची नसते
ती मिळाली तर ठीक नाहीतर तिची मैत्रीण सुंदर दिसते
एकच कांन मंत्र पाळा मित्राणो
जय देवी जय देवी जय बायको
तू सांगेल ते ते मी आयको
जग म्हणेल काय बायकोचा चमचा आहे
सांगा जगाला तो प्रश्न आमचा आहे
शेवटी बायकोच आपल्याला आयुष्य भर सोसते
मित्राणो बायको फक्त आपलीच बायको चांगली असते
0 comments Filed Under: chat, kavita, marathi
ओळख
हात धर हातात
अन चेहर्याकडे बघ
दिसेल एका डोळ्यात
तरंगणारा ढग
दुसरा डोळा गप्पगप्प
दुसरीकडे वळेल
अर्थ लावू नकोस
आपॊआपच कळेल
कितीक चिन्हं चेहर्यावर
येऊन जाऊन असतात
शब्दांवर विसंबणारे
सहजासहजी फ़सतात
चल उगी, तुझी वाट
तुझं वळण, तुझा घाट
तुझ्या मागे मागे येतील
आठवणींचे धागे सात
गुंतू नकोस
गुंफ़ू नकोस
हरवू नकोस
हरूही नकोस
समजेल त्याला कधीतरी
अर्थ तुझ्या मौनाचाही
मागेल तोही हात तुझा
बोलत राहील काहीबाही
हात धर हातात
अन चेहर्याकडे बघ
दिसतील दोन्ही डोळ्यांत
कोसळणारे ढग
0 comments Filed Under: chat, kavita, marathi
आयुष्य खूप सुंदर आहे
आयुष्य खूप सुंदर आहे,
आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसलं तरी,
एकट्यानेच ते फुलवत रहा,
वादळात सगळं वाहून गेल,
म्हणुन रडत बसू नका,
वेगळ अस काही, माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका
मृगाकडे कस्तुरी आहे,
फुलात गंध आहे,
सागराकडे अथांगता आहे,
माझ्याकडे काय आहे, असं म्हणून रडू नका,
अंधाराला जाळणरा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे.
आव्हाहन करा त्या सूर्याला!!!!! मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन.
अंधारामय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून
मग रोजच उगवेल एक नवी सकाळ,
उत्साह ध्येयाने भारुन म्हणून म्हणते.........
आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसल तरी
0 comments Filed Under: chat, kavita, marathi
होळीचा साजना करुन बहाणा...
रंगात तुझ्या रंगून राजसा ओली मी झाले अशी
होळीचा साजना करुन बहाणा किती मला भिजवीशी
.
हातात तुझ्या ती पिचकारी, अन डोळ्यात आगळे भाव
विरोधा माझ्या न जुमानता, तू अचूक साधीशी डाव
साडी ओली केस ही ओले, ओले अंग प्रत्यंग करीशी
होळीचा साजना करुन बहाणा किती मला भिजवीशी ||1||
.
चकवून गेले तुला साजना, अन परसदारी मी पळाले
पाठी येता शोधीत मजला, आपसूक एकांती तुला मिळाले
पिचकारी मग भिरकाऊनी, जवळ ओढूनी मजला घेशी
होळीचा साजना करुन बहाणा किती मला भिजवीशी ||2||
.
अंग ओले परी श्वास गरम, अन बाहूत तुझ्या मी आले
रंगात तुझ्या रंगता सख्या रे, बेभान होऊनी मी गेले
नको नको ना पुरे आता रे, किती तू धसमूसळा होशी
होळीचा साजना करुन बहाणा किती मला भिजवीशी ||3||
.
वस्त्रे गळता राहीले रंग बस, अन अंगास अंगे मिळाली
सरून जाता आवेग सख़्या रे, भासे मोक्ष-मुक्ती मिळाली
आत्मा अंग अन मोहमाया रंग, सख्या रे ईश्वर तू असशी
होळीचा साजना करुन बहाणा किती मला भिजवीशी ||4||
0 comments Filed Under: chat, kavita, marathi
प्रेमीकांचे जेंव्हा लागते लग्न
प्रेमीकांचे जेंव्हा लागते लग्न
प्रेमात येऊ लागतात विघ्न
कोणाचंच फारसं चुकत नसतं
पण काहीतरी नकळत बिनसतं
चंद्र-तारकांचे होतात कांदे-बटाटे
दिसु लागतात फुलांमधले काटे
लाडिक हट्टांच्या अपेक्षा होतात
ओझी वहाण्याच्या शिक्षा होतात
प्रेमपत्रांची होतात वाण्याचि बिलं
नाही कळत,संगीत कुठं हरवलं?
लग्नापुर्वी सोडेना तो तिची पाठ
आता माहेरी जाण्याचि पाहे वाट
पुर्वी जपायची ती त्याचि आवड
आता कामांमध्ये कुठली सवड?
हे सगळं असुन लग्न होतातच
सगळे प्रेमीक हा लाडु खातातच
0 comments Filed Under: chat, kavita, marathi
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही.....
मित्रांची नावे ई-मेल आय.डी. असतात,
भेटायच्या जागा चाट-रूम असतात,
कट्ट्यावर कोणी आता भेटतच नाही,
दिलखुलास शिवी कानी पडतच नाही,
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही
दिसले कि हाय, जाताना बाय
पण समोर असताना प्रश्नचिन्ह, कि बोलायच काय,
अशी खोटी जवळीक मी कधी साधतच नाही,
मुखवट्याआड चेहरा कधी लपवत नाही
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही
आज इथे उद्या तिथे.........कोणासाठी कोणी थांबणार नाही
कोणीतरी साथ द्यावी हा माझा अट्टहास पण नाही,
पण इथुन तिथे जाताना कोणी निरोप तरी देइल कि नाही,
जाताना आपण, कोणी एक अश्रु तरी ढाळेल कि नाही,
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही
[शब्दच हल्ली अर्थ विसरतात,
संवेदनाच हल्ली बधीर होतात,
भावनाच हल्ली बोथट होतात,
अगदी थोडी माणसचं हि कविता शेवटपर्यत वाचतात
0 comments Filed Under: chat, kavita, marathi
