company मधे अनेक mod मुली असतात,
पण जी गोड लाजते,
ती मुलगी मराठी असते.
company मध्ये मुली short top घालतात.
पण जी पाठ दिसू नये म्हणून top खाली ओढते,
ती मुलगी मराठी असते.
company मध्ये मुली jeans घलुन येतात,
पण जि jeans बरोबर पायात पैजण घालते,
ती मुलगी मराठी असते.
कंपनीमधे अनेक मुली असतात
पण वात्रटपणा केल्यावए कानाखाली वाजवते
ती मुलगी मराठी असते
कॉलेजमधे अनेक मुली असतात
स्वतःच्या नोट्स सहज दुसरयाला देते
ती मुलगी मराठी असते
शॉपींगलाही अनेक मुली जातात
खर्चाचा विचार करुन फ़क्त कानातलं घेऊन येते
ती मुलगी मराठी असते
sakali utun darat rangoli kadthe,
V na chukata ji roj dev Puja Karte,
ती मुलगी मराठी असते !!!!!!!!!!!!!!!!!
Marathi chat madhe aaple swagat aahe, kahi lokanchi complaint aahe ki tyana chat box disat nahi, tar sarvani lakshadya ki tumchyakade Flash player installed aahe ani tumhi Mozilla Firefox use karat aahe, karan baki sarva browser madhe chat box cha problem aahe.........
Dhanyavad
ती मुलगी मराठी असते
0 comments Filed Under: chat, kavita, marathi
हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन
हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन
आणि कळतच नाही बोलतय कोण
बोलतच नाही मुळी पलीकडे कोणी
ऐकू येत रहातं फक्त डोळ्यातलं पाणी ...(१)
कळताच मलाही मग थोडंसं काही
मीही पुढे मग बोलतंच नाही
फोनच्या तारेतून शांतता वाहते
खूप खूप आतून अजून काही सांगते ...(२)
नदी नि शेतं नि वार्याची गिरकी
ढगाची विजेने घेतलेली फिरकी
वाळूवर काढलेली पाण्याची चित्रं
"तुझा" पुढे मी खोडलेला "मित्र" ...(३)
टपला नि खोड्या नि रुसवे नि राग
एकदा तरी सहज म्हणून शहाण्यासारखं वाग
हसायचे ढीगभर नि लोळून लोळून
बोलायचे थोडेच पण घोळून घोळून...(४)
वडाचे झाड आणि बसायला पार
थंडीमधे काढायची उन्हात धार
कॉफी घेउन थोडेसे बोलायचे कडू
हसताना पहायचे येते का रडू ...(५)
बोलायचे गाणे आणि बोलायची चित्रं
नुसतीच सही करुन धाडायची पत्रं
क्षणांना यायची घुंगरांची लय
प्राणांना यायची कवीतेची सय...(६)
माणूस आहेस "गलत" पण लिहितोस "सही"
पावसात भिजलेली कवीतांची वही
पुन्हा नीट नव्याने लिहीत का नाहीस?
काय रे.... काही आठवतय का नाही?
शब्दसुद्धा नाही तरी कळे असे काही
हातामधला हात सुद्धा जितकं बोलत नाही...(७)
हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन
आणि कळतच नाही बोलतय कोण
दोन्ही कडे अबोला आणि मध्यात कल्लोळ
छाती मधे घुसमटतात हंबरड्यांची लोळ...(८)
ऐकू येतात कोंडलेले काही श्वास फक्त
कोणासाठीतरी खोल दुखलेलं रक्त
गरम होतात डोळे नि थरथरतो हात
सर्रकन निघते क्षणांची कात...(९)
उलटे नि सुलटे कोसळते काही
मुक्यानेच म्हणतो "नको... आता नाही"
फार नाही... चालतो मिनिटे अवघी तीन
तेवढ्यात जाणवतो जन्माचा शीण
तुटत गेले दोर आणि उसवत गेली वीण
डोळे झाले जुने तरी पाणी नविन...(१०)
हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन....
....sandeep khare
0 comments Filed Under: chat, kavita, marathi, mumbai
अजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही डब्बा
अजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही डब्बा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥धृ॥
आमच्या देखिल मनी आले चांदण्याचे पुर
आम्हालाही दिसल्या शम्मा अन शम्मेचे नूर
अजुन तरी परवाना हा शम्मेपासुन दुर
मैत्रिणीच्या लग्ना गेलो घालुन काळा झब्बा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥१॥
कुणी नजरेचा ताणुन बाण केलेली जखमी
कुणी ओठांची नाजुन अस्त्रे वापरली हुकमी
अन शब्दांचे जाम भरुन पाजियेले कोणी
मयखान्यातही स्मरले आम्हा मंदिर मस्जिद काबा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥२॥
कधी गोडीने गाउ गेलो जोडीने गाणी
रमलो हे जरी विसरुन सारे आम्ही खुळ्यावानी
सर्वस्वाचे घेउनी दाने आले जरी कुणी
अजुन तरी सुटला नाही हातावरचा ताबा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥३॥
कोण जाणे कोण मजला रोखुन हे धरते
वाटा देती हाका तरिही पाउल अडखळते
कुठल्या शपथेसाठी माझी ओंजळ थरथरते
मोहाहुन ही मोहक माझी हुरहुरण्याची शोभा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥४॥
अजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही डब्बा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ...
1 comments Filed Under:
आठवतं तुला ?
आठवतं तुला ?
आठवतं तुला त्या भेटीत
रिमझिम सरींनी छेडलं होतं .
भर दुपारी मला जणू
चांदण्याने वेढलं होतं .
आठवतं तुला त्या भेटीत
श्रावण धुंद बहरला होता .
ओल्या ऋतूत ओल्या स्पर्शाने
ओला देह शहारला होता .
आठवतं तुला त्या भेटीत
दोघे व्याकुळ झालो होतो .
तुझा गंध वेचता वेचता
मीही बकुळ झालो होतो .
आठवतं तुला त्या भेटीत
भावनांनी कविता रचली होती .
माझ्या डोळ्यात तू अन
तुझ्या डोळ्यात मी वाचली होती.
आठवतं तुला त्या भेटीत
आणखी काय घडलं होतं ?
मला स्मरत नाही पुढचं
बहुतेक तेव्हाच स्वप्न मोडलं होतं .
- संदिप खरे
आता उरले ना दिस; रूसण्याचे-भांडण्याचे,
आता उरले ना दिस; रूसण्याचे-भांडण्याचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ धृ ॥
किती काळ रहायचे; मान-अपमानी दंग,
पहा लकाके नभात; कसा शेवटला रंग.
कोण जाणे कोण्या क्षणी; सारे सोडून जायचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ १ ॥
जरी भांडलो-तंडलो; तरी तुझीया सोबती,
दिली दुर्दैवाला पाठ; अन् संकटाला छाती.
सारे कठीण; तुझीया सवे मृदूल व्हायचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ २ ॥
काही उणे माझ्यातले; काही दुणे तुझ्यातले,
बघ शेवटास सारे; कसे सुखमय झाले.
जन्मी पुढल्याही होऊ; अजूनही ओळखीचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ ३ ॥
कष्ट, ध्यास, त्रागा, प्रेम, जिद्द, तडजोड, भीती,
जे जे झरले ते पाणी; आणि उरले ते मोती.
येत्या उद्याने जपावा; असा शिंपला व्हायचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ ४ ॥
हसलो म्हणजे सुखात आहे ऐसे नाही
हसलो म्हणजे सुखात आहे ऐसे नाही
हसलो म्हणजे दुखीः नव्हतो ऐसे नाही
हसलो म्हणजे फ़क्त स्वतःच्या फ़जितीवर
निर्लज्यागत दिधली होती स्वतःच टाळी
हसलो कारण शक्यच नव्हते दुसरे काही
डोळ्यामधे पाणी नव्हते ऐसे नाही
हसतो कारण तुच कधी होतीस म्हणाली
याहुन तव चेहर्याला काही शोभत नाही
हसतो कारण तुला विसरणे जितके अवघड
तितके काही गाल पसरणे अवघड नाही
हसतो कारण दुसर्यानांही बरे वाटते
हसतो कारण तुला सुद्धा ते खरे वाटते
हसलो म्हणजे फ़क्त डकवली फ़ुले कागदी
आतुन आलो होतो बहरुन ऐसे नाही
हसतो कारण जरी बत्तीशी कुरुप आहे
खाण्याची अन दाखवण्याची एकच आहे
हसतो कारण सत्याची मज भिती नाही
हसतो कारण हसण्यावाचुन सुटका नाही....
नसतेस घरी तू जेव्हा...................
नसतेस घरी तू जेव्हा
जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे विरती धागे
संसार फाटका होतो
नभ फाटून वीज पडावी
कल्लोळ तसा ओढवतो
ही धरा दिशाहीन होते
अन् चंद्र पोरका होतो
येतात उन्हे दाराशी
हिरमुसून जाती मागे
खिडकीशी थबकुन वारा
तव गंधावाचून जातो
तव मिठीत विरघळणाऱ्या
मज स्मरती लाघववेळा
श्वासाविण ह्रुदय अडावे
मी तसाच अकंतिक होतो
तू सांग सखे मज काय
मी सांगू या घरदारा ?
समईचा जीव उदास
माझ्यासह मिणमिण मिटतो
ना अजून झालो मोठा
ना स्वतंत्र अजुनी झालो
तुजवाचून उमगत जाते
तुजवाचून जन्मच अडतो !
Author : Unknown.
0 comments Filed Under: chat, kavita, marathi
माझी नवीन गझल - "मी मुंबईकर...."
मी मुंबईकर....
भरून येतात डोळे, दाटून येतो कंठ
पण शब्दांना आता, आवाज नाही माझ्या
आयुष्याची कमाई, चारशे स्क्वेअर फुट फक्त्
सुखांना यायला घरात, जागा नाही माझ्या
त्यांच्या अपेक्षा मोठ्या, तिच्या मागण्या छोट्या
माझ्याच स्वप्नांना इथे, जगात वाव नाही माझ्या
चार आण्याची नोकरी, आठ आण्याची जिंदगी
आयुष्यात रुपया कधी, आलाच नाही माझ्या
दोन वित पोटासाठी, विकली जिंदगी मी
उधार जगण्याला आता, अंत नाही माझ्या
सुन्न घामेजलेली गर्दी, अन कोमेजलेली मनं
बधीर पळणार्या पायांना, ठाव नाही माझ्या
त्यांचा झाला रास्तारोको, यांनी थांबवली रेल्वे
दोन दिवस् घरात चुल, पेटली नाही माझ्या
शिवाजी पार्कवर गर्दी, बोलणारे नेतेही दर्दी,
पण त्या मेंढरांना व्यथांची, जाण नाही माझ्या
लावला लिलाव वेड्यांनी, मजबूर लाचारीचा माझ्या
मग कळाले अस्तित्वाचा, काहीच भाव नाही माझ्या
घातल्या गोळ्या मुर्खांनी, मिटवायला नाव माझे
रक्ताच्या थेंबाला तसाही, कुठेच गाव नाही माझ्या
कधी फुटला बाँब, केव्हा जळाला डबा
प्रेताला अजून इथे, नाव नाही माझ्या
कशी झाली चौकशी, कोणी दिला दाखला
मरणाला कसा कुठलाच, पुरावा नाही माझ्या
कधी झालो मुंबईकर, कधी मिटली ओळख
मरून देखील प्रश्नाला, उत्तर नाही माझ्या
कोणी दिला राजीनामा, कोणी मिळवली पद्के
पण कोणलाही मरणाची, खंत नाही माझ्या
कोणी काढली रॅली, दिल्या चॅनेल्सना बाईटस
दाखवला कळवळा त्याचा, मरणाशी संबंध नाही माझ्या
कुठे गेली मदत, कुठे सहानुभुती त्यांची
पोरक्या घराला कोणीच, वाली नाही माझ्या
बांधली स्मारके त्यांची, ज्यांची मोठी नावे
सामान्यतेचा एकही, कुठेच चिरा नाही माझ्या
बेगडी त्यांची तत्वं, खोट्या त्यांच्या आशा
एक मत सोडून कशालाच, अर्थ नाही माझ्या
गुमान जगणं इथे, मरणं देखील बेनाम
जिवंतपणी कधी लक्षात, आलंच नाही माझ्या
किमंतु
आनंदऋतू प्रकाशन
०७/०१/२००९
